Vikas Gharat : गृहसंकुलाच्या आसपासच्या मोकळ्या जागेची मा.नगरसेवक विकास घरत यांनी स्वखर्चाने केली साफसफाई
पनवेल : कामोठे मधील गोकुळवन आणि वृंदावन या दोन सोसायटीच्या मागणीनुसार सोसायटीच्या आजूबाजूचा परिसर माजी नगरसेवक विकास घरत Vikas Gharat यांनी स्वखर्चाने साफ करून दिला. पावसाळ्यात उद्भवणारे आजार व रोगराई पसरू नये या हेतूने कामोठा येथील नगरसेवक विकास घरत यांच्या पुढाकाराने कामोठ्यात नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जातात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे घरत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कायम तत्पर असतात. कामोठकरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक ठिकाणी मोकळ्या भूखंडाचे सपाटीकरण आणि वृक्षारोपण घरत यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या मोकळ्या भूखंडावर मोठ्या खड्ड्यामुळे पाणी साचले होते. त्यामुळे दलदल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. या साठलेल्या पाण्यामुळे दाट झुडपे देखील वाढली होती. या मोकळ्या जागेत मोठ्या संख्येने उंदिरानी बिळे तयार केली होती.अधून मधून साप दिसत होते.मच्छर यांचे प्रमाण बेसुमार वाढले होते. या सर्वांचा त्रास या रिकाम्या प्लॉट ला लागून असलेल्या इमारतीमधील रहिवाशांना होत होता. Panvel Latest News
मोकळ्या भूखंडावरील खड्ड्यामुळे आणि घाणीमुळे त्रासलेल्या रहिवाशांनी मा. नगरसेवक विकास घरत साफसफाई ची मागणी केली होती. त्रासलेल्या रहिवाशांच्या मागणीला प्रतिसाद देऊन घाणी पासून सुटका केल्यामुळे या परिसरातील रहिवासी देखील आनंदी झाले आहेत. Panvel Latest News