देश-विदेश

Nilesh Lanke : अहमदनगर नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी थेट इंग्रजी मधून खासदारकीची शपथ घेतली

•सुजय विखे पाटील यांनी प्रचारादरम्यान लंकेला हिणविले, थेट इंग्रजी मधूनच शप्पथ

नवी दिल्ली :- अहमदनगर मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारात नीलेश लंके यांच्या शिक्षणावरून त्यांना विरोधकांनी हिणवले होते. त्यात सुजय विखे पाटील यांनी भाषणात नीलेश लंके इंग्रजीतून कसे बोलणार, त्यांना इंग्रजी येते का असा सवाल उपस्थित करत त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र नीलेश लंकेंनी इंग्रजी भाषेत घेतलेली शपथ सध्या चर्चेचा मुद्दा बनली आहे.

प्रतिस्पर्धी सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना इंग्रजी वरून हिनावले होते

सुजय विखे यांनी अहमदनगरमध्ये प्रचारसभेत बोलताना लंकेंवर टीका करताना, त्यांना इंग्रजी बोलता येत नसल्यावरुन खिल्ली उडवली होती. तर, संसदेत जायचे म्हटल्यावर इंग्रजी बोलता आले पाहिजे, असेही ते म्हणाले होते. त्यामुळे, अहमदनगरच्या लोकसभा निवडणुकीत यंदा इंग्रजी भाषा हा मुद्दा चांगलाच गाजला.

मी इंग्रजीतून ते भाषण केले, नीलेश लंके यांनी पाठांतर करून नंतर सभेत इंग्रजीतून भाषण करून दाखवावे, असे आव्हान माजी खासदार सुजय विखे-पाटील यांनी नीलेश लंके यांना दिले होते. आज नीलेश लंके यांनी खासदारपदाची शपथ इंग्रजीमध्ये घेतली. यामुळे त्यांनी एकप्रकारे अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0