J. P. Nadda : जेपी नड्डा यांच्यावर राज्यसभेची मोठी जबाबदारी, सभागृह नेते केले
•सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी महताब यांनी राष्ट्रपती भवनात सभागृहाचे सदस्य आणि कार्यवाहक अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली.
ANI :- 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात सोमवारी (24 जून) खासदारांनी शपथ घेतली. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची राज्यसभेतील सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
18 व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांनी तसेच इतर नवनिर्वाचित सदस्यांनी सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली. कार्यवाहक सभापती (प्रोटेम स्पीकर) भर्त्रीहरी महताब यांनी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात केली आणि सदस्यांना शपथ दिली.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेत आले आहेत. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने 9 जून रोजी शपथ घेतली. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. कामकाज सुरू होताच नरेंद्र मोदी यांनी सभागृह नेते म्हणून सर्वप्रथम शपथ घेतली.