Thane Tadipar News : मनाई आदेश भंग करणाऱ्या तडीपार आरोपीला पोलीसांनी केले अटक..
Thane Tadipar News : कोपरी पोलीसांची कारवाई ; मनाई आदेश भंग करणाऱ्या आरोपीला अटक, पाच जिल्ह्यातून दोन वर्षासाठी केले होते हद्दपार..
ठाणे :- पोलीस आयुक्त ठाणे शहर, आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आरोपींच्या विरोधात कारवाईचा बडगा उभारला आहे. फरार, अंमली पदार्थ विक्री करणारे, चोरी, खुन यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची शिक्षा भोगलेले अनेक तडीपार आरोपी शहरात मोकाट फिरताना दिसत आहे. अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सराईत आरोपींना शहरातून विविध गुन्ह्यात Thane Crime शिक्षा भोगून जामीनावर बाहेर असलेल्या आरोपींना हद्दपार करण्यात आले आहे. अशातच एक आरोपी पाच जिल्ह्यातून दोन वर्षाच्या कालावधी करिता हद्दपार करण्यात आले होते. तरी, त्याचा तडीपाराची कालावधी Tadipar Criminal पूर्ण होण्यापूर्वीच शहरात वावरत होत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. Thane Crime News
आरोपी चंद्रमणी सिद्धार्थ मोरे (26 वर्ष), ठाण्याच्या कोपरी परिसरात राहत होता. त्याला 5 ऑगस्ट 2022 रोजी पोलीस उप आयुक्त परिमंडळ-05 वागळे इस्टेट, ठाणे यांनी ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, रायगड व पालघर या जिल्ह्यातून दोन वर्षाच्या कालावधी करिता हद्दपार करण्यात आले होते. असे असतानाही मनाई आदेश मोडत काढत आरोपी ठाणे शहरात कोणाचीही परवानगी न घेता आज (24 जून) कोपरीच्या धोबीघाट परिसरात आल्या होता. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार शिनगारे यांच्याकडून अटक आरोपीची चौकशी करण्यात येत आहे. Thane Crime News