Mumbai Local Update : उद्या मुंबईत मेगाब्लॉकमुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावरील लोकल गाड्यांवर परिणाम होणार आहे.
Mumbai Local Update : मुंबईत उद्या रविवार (23 जून) रोजी मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान ब्लॉक असेल. यासोबतच माहीम ते गोरेगाव स्थानकादरम्यानही ब्लॉक असणार आहे
मुंबई :- रविवार 23 जून रोजी मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. दुरुस्ती आणि देखभाल च्या कामामुळे मेगाब्लॉक (Mumbai Mega Blog) घेण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासन म्हणून सांगण्यात आले आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान ब्लॉक असेल. यासोबतच माहीम ते गोरेगाव स्थानकादरम्यानही ब्लॉक असणार आहे.
मध्य मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 पर्यंत सीएसएमटी ते विद्याविहारपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे पर्यंत अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. Mumbai Local Update
या कालावधीत सीएमटी-वडाळा ते वाशी/बेलापूर/पनवेल आणि सीएमटी ते वांद्रे आणि गोरेगावपर्यंत धावणाऱ्या गाड्या बंद राहतील. सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. पश्चिम मार्गावर माहीम ते गोरेगावपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. Mumbai Local Update
दरम्यान सीएसएमटी ते वांद्रे, पनवेल, गोरेगाव या लोकल गाड्या बंद राहतील. चर्चगेट ते विरार, डहाणूपर्यंत कोणताही ब्लॉक असणार नाही. येथील गाड्या सुरू राहतील. रेल्वेच्या दुरुस्ती आणि देखभालासाठी मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. रविवार असल्याने रेल्वेची स्थिती जाणून घेऊनच लोक घराबाहेर पडले. Mumbai Local Update