Prashant Patil : राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे Sharad Pawar प्रदेश सरचिटणीस आणि पनवेल-उरणमधील Panvel पक्षाचा चेहरा असलेले प्रशांत पाटील Prashant Patil Died यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
प्रशांत पाटील हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते.गणेश नाईक यांचे समर्थक म्हणून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.त्यानंतर मात्र ते शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले.अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर सुद्धा ते शरद पवार यांच्यासोबत राहिले. त्यांना प्रदेश कार्यकारणीवर जबाबदारी देण्यात आली होती. पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख होती.काल अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्यावर अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.आज दुपारी मात्र त्यांची असलेली मृत्यूशी असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांना डाॅक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या जाण्याने महाविकास आघाडी च्या गटात दुःखाची छाया पसरली असून त्यांच्यावर उरण येथील भेंडखळ या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते.