देश-विदेश

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर परिसरात गोळीबार, पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Firing at Ram Temple security Policeman in Ayodhya : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील रामजन्मभूमी येथे असलेल्या राम मंदिरात एका एसएसएफ जवानाचा संशयास्पद गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे.

ANI :- उत्तर प्रदेशातील अयोध्येतील रामजन्मभूमी येथे असलेल्या राम मंदिरात Ram Mandir एका एसएसएफ जवानाचा संशयास्पद गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे 5.25 वाजता घडली. पोलीस सूत्रांनी सांगितले की, राम मंदिर परिसरात गोळीबाराचा आवाज ऐकू आला होताच सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, जखमी जवानाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी जवानाला मृत घोषित केले. 25 वर्षीय शत्रुघ्न विश्वकर्मा असे या जवानाचे नाव आहे. या घटनेचे कारण समोर आले नव्हते.

ही घटना उघडकीस येताच रामजन्मभूमी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण रामजन्मभूमी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या रामजन्मभूमी संकुलातील आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0