ऑनलाइन लाखोचा गंडा ; बिटकॉइन, क्रिप्टो करन्सी गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक
Dombivli Online Scam : ऑनलाइन आर्थिक गुंतवणूक करून फसवणूक झाल्याची घटना डोंबिवली मध्ये समोर आली आहे, बिटकॉइन, क्रिप्टो करन्सी कशाप्रकारे खरेदी-विक्री करायची याद्वारे फसवणूक
डोंबिवली :- ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाने फसवणूक (Online Fraud) झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. डोंबिवली मध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रेडिंग(Dombivli Trading Scam) च्या नावाने फसवणूक झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशातच डोंबिवली पश्चिम येथे राहणाऱ्या अनिकेत नामदेव गजरमल (41 वर्ष) यांची ऑनलाइन आर्थिक फसवणुकीबाबतची तक्रार विष्णुनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीने त्यांना क्रिप्टो करन्सी, आणि बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करून खरेदी विक्रीचे व्यवहार कसे करायचे याबाबत सांगून फसवणूक झाल्याची तक्रार विष्णूनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. Dombivli Online Scam
ॲपच्या माध्यमातून फसवणूक
Binance app/OKX app या दोन ॲप मध्ये गजरमाल यांना खाते उघडण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना व्हाट्सअप वर एका ग्रुप मध्ये जॉईन करण्यास सांगून टेलिग्राम मधील ट्रेडिंग मध्ये टिप्स एक्सप्लेन आणि क्रिप्टो करन्सी आणि बीट कॉइन खरेदी-विक्री कसे करायचे आणि कसा अधिक नफा मिळवायचा हे दाखवण्यात आले. तसेच तिथे गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळेल या आमिषाला बळी पडत गजरमल मला यांनी जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने त्या ॲप मध्ये चार लाख 72 हजार रुपयांचे ऑनलाईन गुंतवणूक केली होती. काही कालावधीनंतर भरलेल्या रकमेवर आर्थिक फायदा मिळेल अशी अपेक्षा होती परंतु कोणत्याही प्रकारे आर्थिक मोबदला न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येतात गजरमल डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गजरमल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क), (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गमे हे करत आहे. Dombivli Online Scam