मुंबई

Amit Thackeray : मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे राज्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र मुलींच्या शिक्षणाबाबत या विषय संदर्भात केली मागणी

Amit Thackeray Wrote a letter to Chandrakant Patil : राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे शिक्षण मंत्री यांना पत्र मुलींच्या मोफत उच्च शिक्षण देण्यासंदर्भात घोषणा केलेल्या सीईटी बाबत जीआर काढा

मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मुलींच्या शिक्षणा संदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून मुलींच्या सीईटीच्या मोफत शिक्षणासंदर्भात काढलेल्या अध्यादेशाचे अद्यापही जीआर काढले नाही ते जीआर लवकरात लवकर काढावे अशी मागणी मनसे विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे यांनी केले आहे. जेणेकरून उच्च शिक्षण घेण्याची इच्छावापेक्षा असणाऱ्या गरजू व गरीब मुलींचे भविष्य सुरक्षित होईल. 16 जून 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता एम एच टी-सी ए टी परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

अमित ठाकरे यांचे पत्र जशास तसे…

उच्च व तंत्र शिक्षण अंतर्गत येणाऱ्या 642 कोर्सपेक्षा अधिक कोर्स मुलींना मोफत देण्याची घोषणा करूनसुद्धा अद्याप शासन निर्णय (GR) प्रसिद्ध न होण्याबाबत..

9 फेब्रुवारी 2024 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे आयोजित एका कार्यक्रमात आपण ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना मेडिकल तसेच अभियांत्रिकी आणि अन्य 642 पेक्षा अधिक अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाणार असल्याची घोषणा केली. या निर्णयामुळे गरीब घरातील मुलींसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली झाली होती. इयत्ता बारावीनंतर अनेक हुशार मुलींना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. त्यामुळे बारावी नंतर शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संख्येतील घट पाहून सरकारने हा निर्णय घेतला होता. शासनाच्या या निर्णयानुसार अंदाजे 5300 उच्च महाविद्यालयांतर्गत 642 कोर्ससाठी 20 लाख मुलींकरिता 1800 कोटी रुपयांचा भार राज्य शासन उचलणार असल्याचे समजले.

यासंबंधीचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या उपसमितीत घेण्यात आला असून, लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत हा निर्णय होईल आणि त्याची अंमलबजावणी सुरू होईल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, अद्याप शासनाने या योजनेसंबंधी कोणताही शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केलेला नाही. यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचे भवितव्य आजही अंधारात आहे. तसेच उच्च शिक्षण महाविद्यालयेसुद्धा याबाबत सरकारकडून कोणतीही सूचना किंवा

आदेश न मिळाल्याने संभ्रमात आहेत. काल, 16 जून 2024 रोजी सायंकाळी 06.00 वाजता एमएच-सिएटी (MH-CET) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

अशा स्थितीत आपण तात्काळ कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन शासकीय आदेश (GR) पारित करावा, जेणेकरून उच्च शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा व अपेक्षा असणाऱ्या गरजू व गरीब मुलींचे भविष्य सुरक्षित होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0