Nalasopara Crime News : विरार गुन्हे शाखा कक्ष-3 यांची मोठी कारवाई ; सराईत आंतरराज्य चैनस्नॅचिंग आणि बॅग लिफ्टींग करणाऱ्या दोन आरोपींच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या
•Nalasopara Crime News दोन्ही आरोपींवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई इतर अनेक ठिकाणी तब्बल 15 पोलीस ठाण्यात चोरींचे गुन्हे दाखल, तर एका आरोपीवर उत्तर प्रदेश राज्यातही गुन्हे दाखल
नालासोपारा :- आंतरराज्यीय चैनस्नॅचिंग आणि बॅग लिफ्टींग करणाऱ्या आरोपींना विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-3 यांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. तसेच आरोपींनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे सह उत्तर प्रदेश राज्यातही अशाच प्रकारे चोरी केल्याची त्यांच्यावर नोंद आहे. पोलिसांच्या तपासा आधी आरोपी हे सर्रास गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र मध्ये चोरीच्या गुण्यासह बेकायदेशीरित्या हत्यार बाळगल्या प्रकरणे, अमली पदार्थ तस्करी, हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चैनस्नॅचिंग घटना समोर येत आहे या गुन्ह्यात वाढ होत असताना वरिष्ठांनी गुन्ह्याचे गांभीर्य त्या लक्षात घेऊन गुन्हेगारांना शोधून त्यांना पाय बंदी करण्याकरिता सूचना देण्यात आल्या होत्या.
पोलिसांकडून आरोपींना अटक, आरोपींनी काही दिवसांपूर्वी नालासोपारात केली होती चैनस्नॅचिंग.
नालासोपाराच्या सेक्रेट हायस्कूल जवळ अमेय अपार्टमेंट येथे रोड वरून पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याचे मंगळसूत्र आरोपींनी चैनस्नॅचिंग करून मोटरसायकल वरून पळ काढला होता. ज्याची किंमत एक लाख रुपये होते. पोलिसांनी या अनुषंगाने नालासोपारा पोलीस ठाण्यात कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपायुक्त पुणे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळीचे सीसीटीव्हीचे फुटेजमध्ये मदतीने आणि तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे दोन आरोपींना अटक केली आहे. या दोन आरोपींची नावे ,
1.आशिष कुमार उर्फ उल्लू उर्फ बोदरिया राजकुमार भातु (38 वर्ष) मूळ राहणारा उत्तर प्रदेश.
2.अमितकुमार प्रदीप कुमार (36 वर्ष) या आरोपींना पोलिसांनी 14 जून रोजी ताब्यात घेतले. तसेच आरोपींकडून चोरीमध्ये वापरलेली बजाज कंपनीचे डिस्कवर बाइक आणि हेल्मेट जप्त केले असून पोलिसांनी दोन्ही आरोपींचे तब्बल 15 गुन्ह्यांची उकलन केले आहे. तसेच आरोपी अमित कुमार प्रदीप कुमार याच्यावर उत्तर प्रदेश मध्ये तब्बल 14 गुन्ह्यांची नोंद असल्याची पोलिसांच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), प्रकाश गायकवाड पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 (अतिरिक्त कार्यभार गुन्हे शाखा), भास्कर पुकळे सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुनित जाधव, मनोज तारडे, तुषार दळवी, आतिश पवार,प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-3 तसेच सहाय्यक पोलीस फौजदार संतोष चव्हाण सायबर सेल यांनी उकृष्टरित्या कामगिरी पार पाडली असून सराईत आरोपींना अटक केली आहे.