“The Ultimate Showdown: Navi Mumbai’s Dance Bar Connection Unveiled by Maharashtra Mirror’s Sting Operation”

- ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालवले जातात डान्सबार
- नवी मुंबईत डान्सबारचे बाळा आण्णा विश्वनाथ आण्णा कनेक्शन
- नवी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार, महाराष्ट्र मिररचे स्टिंग ऑपरेशन
नवी मुंबई-महाराष्ट्र मिरर, विवेक जगताप:- पुण्याच्या घटनेनंतरही नवी मुंबईत डान्सबारचा (Navi Mumbai Dance) जोर कायम, अनधिकृत डान्सबार, पब, पोलिसांच्या वरदहस्ते खुलेआम जोरात. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र मिरर यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या बातमीनुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 1, परिमंडळ 2,हद्दीतील डान्सबार मध्ये खुलेआम छम छम चालू असल्याची खात्रीदायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत डान्सबार चे प्रमाण सातत्याने वाढत चालल्याचे दिसून येत आहे. ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली डान्सबार चालू असल्याची खात्रीदायक माहिती समोर आली आहे. अनेक ऑर्केस्ट्रा बार वर पोलिसांकडून कारवाईचे सत्र चालू असूनही सर्रास बारमालक पोलिसांना बगल घालत शासनाच्या नियमाला पायदळी तुडवत पहाटेपर्यंत डान्सबार चालू ठेवत आहे. या डान्सबार मालकांना राजकीय पाठबळ आहे का? की कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हे डान्सबार चालवले जातात का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. 31 डिसेंबरला नवीन वर्षाच्या स्वागताकरिता देशभरात जल्लोष साजरे करत असताना नवी मुंबईत डान्सबारमध्ये लाखो आणि कोट्यावधी रुपयाचे उलाढाल झाली होती.प्रशासनाचे या गोष्टीकडे लक्ष आहे का? Navi Mumbai Dance Bar News



डान्सबार मालकांवर वरदहस्त?
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 1 आणि परिमंडळ 2 च्या हद्दीत काही डान्सबार सर्रासपणे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार चालवत आहे. परिमंडळ 2 च्या हद्दीतील सर्व डान्सबारचे कलेक्शन विष्णू अण्णा हा वसुली करून देतो अशी माहिती सध्या समोर आली आहे. तसेच त्याच्या साथीदार बाला आण्णा हा परिमंडळ एक च्या हद्दीतील डान्सबार चे कलेक्शन गोळा करतो. यांच्यावर कारवाई होणार का? पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे का ? Navi Mumbai Dance Bar News
पोलिसांची तात्पुरती कारवाई
नवी मुंबईत पोलीस (Navi Mumbai Police) आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानंतर गेल्या तीन-चार महिन्यात ऑर्केस्ट्रा बार वर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. पनवेल मधील क्रेझी बॉईज रेस्टॉरंट अँड बार 26 ऑगस्ट 2023 मध्ये कारवाई करण्यात आली असून या रेस्टॉरंट अँड बार यांनी नियमाचे उल्लंघन केल्यामुळे 30 ऑगस्ट 2023 रोजी ह्या बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरातील नटराज बार ॲण्ड रेस्टॉरंट यांच्यावर 19 ऑक्टोंबर 2023 रोजी कारवाई करण्यात आली होती. तसेच 5 जानेवारी 2024 रोजी नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेल नटराज रेस्टॉरंट यांचा परवाना पोलिसांनी रद्द केलाय या दोन्ही बारवर ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली डान्सबार चालवण्याचे काम बारकांकडून होत आहे. आता पोलीस प्रशासन परिमंडळ 1 आणि 2 हद्दीतील डान्सबार वर कारवाई करणार का? विष्णू अण्णा आणि बाला आण्णा नियमाचे उल्लंघन करून सर्रास डान्स बार चालवणाऱ्या बारमालकांवर कारवाई होणार का? हे पाहणे आवश्यक राहील. Navi Mumbai Dance Bar News
“New Mumbai’s Hidden Connection: The Story of Vishwanath-Bala Anna and the Dance Bar”
डान्सबार मालकांचे नेटवर्क
नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परिमंडळ एक आणि दोन या संपूर्ण पोलिसांच्या हद्दीत जवळपास 30 हून अधिक डान्सबार सध्या ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली डान्सबार चालवतात आहे. हे डान्सबार स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून जोरदार रात्रंदिवस डान्सबार चालवतात महाराष्ट्र मिरर ने केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये असे दिसून आले की विश्वनाथ देवडीगा उर्फ विष्णू अण्णा हा परिमंडळ 2 हद्दीतील सर्व डान्सबारचे कलेक्शन करून स्थानिक प्रशासनाला दरमहा ठराविक रक्कम देत असतो. तर बाला अण्णा परिमंडळ एकच्या हद्दीतील सर्व डान्सबार चे कलेक्शन करून एक ठराविक रक्कम स्थानिक प्रशासनाला देत असतो. अनेक वेळा डान्सबार मालकांना सांगून प्रशासनाकडून धाडी घातल्या जात असतात. डान्सबार मालकांना बारवर धाड पडण्याच्या पूर्वसूचना प्रशासनाकडून दिली जाते. प्रशासन ज्यावेळी बारवर धाड टाकण्यासाठी येतो त्यावेळी बारच्या वॉचमन कडून एक विशेष बटन दाबून बारमधील लाईट बदलण्याचा इशारा करून खतरा असल्याचे सूचना देत असतो. तसेच शासनाने दिलेल्या नियम अटी घालून एका बारमध्ये कमीत कमी चार ते पाच महिला बारडान्सर असणे आवश्यक आहे.परंतु हे बारमालक नियमाचे उल्लंघन करून जवळपास 25 ते 30 महिला बारडान्सर या डान्स बार मध्ये असतात. ज्यावेळी पोलिसांनी डान्सबार मध्ये किती महिला आहे हे पाहण्यासाठी येत असतात त्यावेळी वाचमेन कडून एक विशेष बटन दाबून बार मालकांना सूचना दिली जाते. अशावेळी उर्वरित सर्व डान्सबार महिलांना बारमध्ये एका विशिष्ट रूमची व्यवस्था केली जाते ती रूम केवळ तेथे काम करणाऱ्या कामगारांना बारमालकांनाच माहीत असते. साधारण अशा रूम हे किचनच्या किंवा वॉशरूमच्या परिसरात एका छुप्या पद्धतीने तयार केले असतात. दररोज बारची पाहणी करण्याकरिता येत असतात अशा वेळेस या महिलांन त्या रूममध्ये लपून ठेवले जाते. त्या रूममध्ये जवळपास 20 ते 25 महिला लपवू शकतात अशी जागा केली असते. अशा गोष्टीने हे डान्सबार मालक पोलिसांची दिशाभूल करत आहेत. प्रशासनाला पाहिजे रक्कम देऊन प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सरकारचे सर्व नियम बाजूला सारून सर्रास डान्सबार पहाटेपर्यंत चालवत असतात. Navi Mumbai Dance Bar News
The Mysterious Connection Between the Dance Bar and Vishwanath-Bala Anna
नवी मुंबईतील ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली चाललेल्या डान्स बार यांचे नावे
काँगो, क्रेझी बॉय ,साई पॅलेस बिंदास, साई निधी चांदनी, नटराज, गोल्डन नाईट, नाईट रायडर, मून नाईट, आयकॉन, ग्रेट्स, कपल डिंपल, इंटरनेट, कॅप्टन, व्ही व्ही आय पी, बिग बॉस, नाईट एंजल, नाईट सिटी, स्टार नाईट,बेबो, आयकॉन, कॅबाना, वाईट हाऊस,लव्ह, सोना, क्रेझी स्टार, स्टार गोल्ड, राजा महाल, सावली, सेल्फी, नटराज, संडे, मधुबन, कपिल किनारा, मेट्रो, दिलरुबा, रमेश, हेवन सिक्स, सेंटर पॉईंट, शंपून, एम एच 43, एसबी नाईट, सेंटर पॉईंट, ब्लू स्टार, रसना, आदर्श, बेला.. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परिमंडळ एक आणि परिमंडळ दोन हे सर्व डान्सबार चालत आहे. पोलीस आयुक्त नवी मुंबई मिलिंद भांबरे यांच्यावर कारवाई करणार का ? डान्सबार बंद करण्याकरिता माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी अनेक कायदे लागू केले होते डान्सबार मुक्त महाराष्ट्र असा नारा दिला होता. डान्सबार मुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाल्याच्या अनेक गोष्टी आहे. प्रशासन आता कारवाई करणार का? नवी मुंबईत पैशाची उधळण थांबणार का ? डान्सबार मालकांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनावर कारवाई करणार का ? या सर्व डान्सबारचे स्टिंग ऑपरेशन महाराष्ट्र मिरर केले असून डान्सबारचा पोल खोल येत्या काही दिवसात करणार आहे. क्रमशः


