Maharashtra politics : लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा
•भाजपला कोणीही पराभूत करू शकत नाही, असे वातावरण संपूर्ण देशात निर्माण झाले होते, मात्र राज्यातील जनतेने भाजपला प्रत्युत्तर दिल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. हा लढा लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी होता. हा विजय आमचा शेवटचा नाही, तर लढाई नुकतीच सुरू झाली आहे. त्याचवेळी शिंदे गटाबाबत ते म्हणाले की, जे सोडून गेले त्यांना पुन्हा पक्षात घेतले जाणार नाही.
मुंबई :- महाविकास आघाडी यांनी विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसंदर्भात आमची पहिली बैठक झाली. या बैठकीत आम्ही सर्वजण मिळून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले की, देशातील लोकशाही वाचवण्यासाठी राज्यातील जनतेने लोकसभा निवडणुकीत मतदान केले. लोकशाही वाचवण्यात राज्यातील जनतेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनीही सरकारला संदेश दिला आहे. महायुतीचे धार्मिक ध्रुवीकरणही कामी आले नाही. येत्या काही दिवसांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महत्त्वाच्या महानगरपालिका म्हणजेच बीएमसी आणि इतर महत्त्वाच्या महापालिका निवडणुका होणार आहेत. जनतेने जाणीवपूर्वक मतदान केले. आमच्यात कोणी लहान किंवा मोठा भाऊ नाही. आपण सर्वजण भेटून चर्चा करू.
उद्धव ठाकरे पत्रकार परिषद काय म्हणाले?
महाविकास आघाडीने शनिवारी राज्यातील जनतेचे आभार मानण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी नाशिकमध्ये 22 जानेवारी रोजी सभा घेतली होती. त्या दिवशी मी काळाराम मंदिरात भगवान रामाचे दर्शन घेतले. त्या ठिकाणी मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपमुक्त राम हवा आहे. मग हा भाजपमुक्त राम अयोध्यावासियांनी करुन दाखवला. त्या ठिकाणी भाजपला यश मिळाले नाही.
मुस्लिम कुटुंबीयांच्या घरी खाल्लेल्या मिळाला मोदी जागले का?
नरेंद्र मोदी यांचे बालपणच मुस्लिम कुटुंबियांच्या मध्ये गेले असल्याचे ते सांगतात. त्यामुळे ते खाल्लेल्या मिठाला जागले की नाही? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ज्या कुटुंबात मुस्लिम कुटुंबीयांच्या घरी मोदी यांनी जेवण केले. त्या खाल्लेल्या मिठाला मोदी जागले की नाही, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यायला हवे, असा खोचक सवाल त्यांनी विचारला. मी फक्त मिठाबाबत बोलत आहे. मीठ नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात. त्यामुळे तो त्यांचा प्रश्न आहे, असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
नरेटीव्ह वरुन देवेंद्र फडणवीस यांना सुनावले ; उद्धव ठाकरे
खोटो नरेटीव्ह सेट करुन महाविकास आघाडीने खोटा प्रचार केला असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. आघाडीची सत्ता आल्यास तुमची संपत्ती जप्त करतील, मंगळसुत्र काठून घेतील, म्हैस पळवून नेतील, हे सर्व खरे नेरेटीव्ह होते का?असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
वंचित आघाडीला उद्धव ठाकरे यांचा सल्ला
वंचितने सर्वात अगोदर उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यानंतर वंचितला महाविकास आघाडीच्या मंचावर स्थान पण मिळाले. पण कुरबुर थांबता थांबेना. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित स्वतंत्र लढणार असल्याची भूमिका मांडली. त्यानंतर वंचितने अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले. त्यांना लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले. त्यामुळे आता राज्यात विधानसभा निवडणुकीत वंचिताला सोबत घेणार का असा प्रश्न समोर येणे साहाजिक होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी थेट उत्तर दिले.