Mumbai Ice Cream News : आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले, पोलिसांनी ही माहिती दिली
Mumbai ice cream with human finger : मालाड पोलिसांनी सांगितले की, आईस्क्रीममध्ये सापडलेला मानवी भाग फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच तपास पुढे जाईल.
मुंबई :- मालाड परिसरात ऑनलाइन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचे तुकडे (Mumbai ice cream with human finger) सापडल्याच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. ब्रँडन फेराओ (26 वर्ष) नावाच्या डॉक्टरने हे आइस्क्रीम ऑर्डर केले होते. कापलेले बोट सापडल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी आता पोलिसांचे म्हणणे आहे की, आइस्क्रीममध्ये सापडलेला मानवी भाग फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. Mumbai Ice Cream News
या प्रकरणाबाबत मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र अडणे म्हणाले की, याप्रकरणी आमचा तपास सुरू आहे. आइस्क्रीममध्ये सापडलेले मानवी भाग तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच तपास पुढे जाईल. याप्रकरणी आम्ही काही लोकांची चौकशी केली आहे.ज्या झेप्टो स्टोअरमधून हे आईस्क्रीम ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर पाठवण्यात आले होते, त्या दुकानाचे विवरणही आम्ही घेतले आहे. सध्या आमची आईस्क्रीम विकणाऱ्या कंपनीशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत आहोत, त्यानंतरच काहीतरी समोर येईल.
ब्रँडन फेराओ यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी युम्मो कंपनीचे बटरस्कॉच आइस्क्रीम ई-कॉमर्स ॲपद्वारे ऑर्डर केले होते. दुपारच्या जेवणानंतर आईस्क्रीम खाताना त्याला एक नखे असलेला मांसाचा तुकडा सापडला. याबाबत त्यांनी कंपनीच्या इन्स्टाग्राम पेजवरून तक्रार केली. कंपनीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मांसाचा तुकडा बर्फाच्या पिशवीत ठेवला आणि मालाड पोलीस ठाणे गाठले, तेथे त्यांनी तक्रार दाखल केली. Mumbai Ice Cream News