Mira Road Cyber Fraud : सायबर पोलीस ठाणे यांची यशस्वी कामगिरी ; फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश
नालासोपारा :- अलीकडे ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांत बरीच वाढ झाली आहे. Mira Road तर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विरा यांच्यासोबत झाली आहे. Nalasopra Cyber Fraud Any Desk App डाउनलोड करण्यास सांगून 98 हजार 570 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील काशिमिरा पोलीस ठाणेचे हद्दीतील तक्रारदार विरा यांना त्यांचे मोबाईलवर क्रेडिट कार्ड अपडेट करण्याकरीता अनोळखी लिंक प्राप्त झाली, तक्रारदार याने लिंकवर क्लिक केले असता त्यांचे मोबाईल मध्ये एक ॲप डाऊनलोड झाले. त्यानंतर तक्रारदार यांचे क्रेडिट कार्डाचे खात्यातुन 48 हजार 500 रु कपात झाल्याचा मेसेज प्राप्त झाला., तसेच तक्रारदार शिंदे यांचे व्हॉटअपवर ॲप डाऊनलोड करण्याबाबत लिंक प्राप्त झाली, तक्रारदार यांनी लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांचे मोबाईलमध्ये अनोळखी ॲप डाऊनलोड झाले, त्यानंतर तक्रारदार यांचे बैंक खात्यातुन रक्कम 50 हजार रुपये कपात झाल्याबाबत त्यांना प्राप्त झाला, दोन्ही तक्रारदार यांची आर्थिक फसवणूक झाल्यानंतर सायबर पोलीस ठाणे येथे तक्रारी अर्ज दिल्याने तात्काळ नोंद घेवून NCCRP Portal पर ऑनलाईन तक्रार नोंदविण्यात आली आहे.
ऑनलाईन NCCRP Portal पर तक्रार नोंदविल्याने फसवणुकीची वर्ग झालेली रक्कम संशयीत बँक ऑनलाईन पेमेंट गेटवे खात्यात गोठविण्यात आली त्यानंतर तक्रारदार यांच्या खात्यातुन वर्ग झालेली रक्कमेचे पुढील व्यवहार तात्काळ थांबवून तक्रारदार यांच्या रक्कम मुळ खात्यात जमा केले आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे, पोलीस अंमलदार ओकार डोंगरे, सहाय्यक फौजदार मिलासिस फर्नांडिस, पोलीस अंमलदार सावन शेवाळे, महिला पोलीस अंमलदार माधुरी धिंडे यांनी पार पाडली आहे.