Dehradun News : चमोली हिमसखलनात 47 मजूर अजूनही बर्फाखाली गाडले, लष्कराचे 9 तास बचावकार्य सुरू

Dehradun Rescue Operation : चमोली बद्रीनाथ महामार्गावर काम करणारे कामगार दरड कोसळल्याने गाडले गेले आहेत. या घटनेनंतर तेथे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
ANI :-उत्तराखंडमध्ये निर्माणाधीन चमोली बद्रीनाथ महामार्गावर शुक्रवारी मोठा अपघात झाला. येथे बर्फवृष्टी झाल्यानंतर महामार्गावर काम करणारे 57 मजूर बर्फाखाली अडकले गेले. बीआरओ आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.याशिवाय आयटीबीपीची तुकडीही दाखल झाली असून बचावकार्य सुरू झाले आहे. मात्र, बर्फवृष्टीमुळे महामार्ग बंद झाल्यामुळे एनडीआरएफची टीम अद्याप पोहोचू शकलेली नाही.
एसडीआरएफ आणि एनडीआरएफ घटनास्थळी रवाना झाले आहेत, मात्र महामार्ग बंद झाल्यामुळे ते मार्गातच अडकले आहेत. डीएम डॉ. संदीप तिवारी यांनी दिलेल्या माहितीत, बांधकामात गुंतलेले 57 मंजूर अडकल्याचे सांगण्यात आले आहे.हवाई दलाची मदत घेण्यात येत आहे. बंकर तपासले जात आहेत. या घटनेवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गढवाल सेक्टरमधील माना गावाजवळील GREF कॅम्पमध्ये हिमस्खलन झाले. प्रचंड हिमवृष्टी आणि किरकोळ हिमस्खलन होऊनही, भारतीय लष्कराच्या IBEX ब्रिगेडने तातडीने बचाव कार्य सुरू केले. आतापर्यंत 10 जवानांना वाचवण्यात यश आले असून त्यांना लष्कराकडून वैद्यकीय मदत देण्यात येत आहे.