28th Annual Police Sports Competition : पोलीस गाजवणार मैदान ! नवी मुंबईचे पोलीस उतरले मैदानात
•28th Annual Police Sports Competition by Navi Mumbai Police Commissionerate नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून 28 व्या वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धा
नवी मुंबई :- पोलीस ज्याप्रमाणे राज्याचे, शहराचे, जिल्ह्याचे रक्षण करत असतात त्याचप्रमाणे त्यांचे मनोबळ वाढवण्यासाठी आणि त्यांच्यातला खेळाडू कायमस्वरूपी जिवंत राहवे याकरिता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून 28व्या वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धा आयोजित 28th Annual Police Sports Competition करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पोलिसात मधील खेळाडू बाहेर येऊन मैदानात उतरला आहे. यामध्ये मैदानी, वैयक्तिक, सांधिक खेळाचे प्रकार आहे.
नवी मुंबईमध्ये 28 व्या वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन 28th Annual Police Sports Competition पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानात आयोजित करण्यात आले आहे. 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर असा स्पर्धेचा कालावधी असणार आहे.पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे,अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे, नवी मुंबई यांच्या अधिपत्याखाली संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) नवी मुंबई, सहायक पोलीस आयुक्त, (प्रशासन),धर्मपाल बनसोडे, यांचे मार्गदर्शनाखाली आणि शांताराम वाघमोडे, राखीव पोलीस निरीक्षक, मुख्यालय, नवी मुंबई, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील राखीव पोलीस उपनिरीश्वक यांच्या शुभहस्ते मैदानाचे पूजन करुन क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले आहे. उद्द्घाटन प्रसंगी सर्व खेळाडू व पोलीस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.स्पर्धेत नवी मुंबई आयुक्तालयातील परिमंडळ-1, परिमंडळ 2, आयुक्तालय व मुख्यालय अशा चार संघांचा समावेश आहे. चार संघ मिळुन एकुण 73 खेळाडु सहभागी झाले आहेत. त्यामध्ये पुरूष 49 महिला 24 खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धेमध्ये पुरूष विभागामध्ये 8 सांधिक तर 9 वैयक्तीक क्रिडा प्रकारांचा सहभाग करण्यात आलेला असुन महिला विभागामध्ये 5 सांधिक व 8 वैयक्तिक क्रिडा प्रकारांचा समावेश आहे.
हॉकी, बास्केटबॉल, हॉलीबॉल, खो-खो, कुस्ती, ज्युदो आणि ॲथलेटीक्स या क्रिडा प्रकारात 10,000 मी. धावणे (पुरूष/महिला), 1500 मी. धावणे (पुरूष/महिला), 4 X 100 मी. रिले (पुरुष/महिला), गोळा फेक (पुरूष/महिला), 400 मीटर धावणे (पुरुष/महिला), उंच उड़ी (पुरूष/महिला), हातोडा (पुरूष/महिला) या स्पर्धा आहे.