मुंबई

मुंबईत 17 बांगलादेशी नागरिकांना अटक, 8 संशयित तृतीयपंथी समावेश

•मुंबई शहरात मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिकांना अवैध मार्गाने आणल्याचं पोलीस तपासातून उघड झालं आहे.

मुंबई :- मुंबई पोलिसांच्या शिवाजीनगर आणि आरसीएफ पोलिसांनी केलेल्या कारवाईत 17 बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रांसोबत अटक करण्यात आली आहे. हे सर्व बांगलादेशी नागरिक अवैध मार्गाने भारतामध्ये दाखल होऊन शिवाजीनगर आणि आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.पोलिसांनी सापळा ही कारवाई केली आहे. यामध्ये 8 संशयित तृतीयपंथी समावेश असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे त्यांचेविरोधात नियम 3 सह 6 पारपत्र (भारतात प्रवेश) 1950 सह 3 (1) परकिय नागरिक आदेश 1948 सह 14 परकिय नागरिक कायदा 1946 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर सी एफ पोलीसांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 4 पुरुष व 5 महिला असे एकुण 9 नागरिकांना ताब्यात घेवून चौकशी केली असता ते बांगलादेशी नागरिक निष्पन्न झाल्याने त्यांचेवर देखील कारवाई करण्यात आली.कोणी साथीदार आहे का आणि मुंबई शहरात अजून किती बांगलादेशी नागरिकांना आणण्यात आलं आहे याचा तपास सुरू केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, देवेन भारती,पोलीस सह आयुक्त, का व सु, सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, डॉ महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-6, नवनाथ ढवळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त देवनार विभाग आबुराव सोनावणे व ट्रॉम्बे विभाग, राजेश बाबाशेट्टी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे, बापूराव देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर सी एफ पोलीस ठाणे, राजेशकुमार गाठे व दहशतवाद विरोधी कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक विक्रांत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्वे व पथक यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0