Bhayandar Drug News : २५१ ग्रॅम एम.डी. मॅफेड्रॉन जप्त : नवघर पोलिसांची धडक कारवाई

भाईंदर | अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत नवघर पोलिस ठाण्याच्या गुन्हे Navghar Police Crime Branch प्रकटीकरण पथकाने २५१ ग्रॅम वजनाचा ₹१२,५५,००० किंमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. Bhayandar Police Latest News
दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बाथरूमसमोर, नवघर फाटक सबवे जवळ काळ्या शर्ट-पँटमध्ये उभ्या असलेल्या इसमाच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. चौकशीत त्याने आपले नाव साहिल विजय सिग (वय २०, रा. मिरा रोड पूर्व, व्यवसाय – कॉल सेंटर नोकरी) असे सांगितले. दोन पंचांच्या उपस्थितीत अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ₹१२.५५ लाख किंमतीचा मॅफेड्रॉन आढळून आला.
या प्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ४०९/२०२५ नोंदवण्यात आला असून आरोपीवर एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(क), २२(क), २९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल तळेकर करीत आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, उप आयुक्त राहुल चव्हाण (परिमंडळ १) व सहायक पोलीस आयुक्त सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी, पोलीस निरीक्षक मुकुंद यादव (गुन्हे), पोलीस निरीक्षक दत्तात्रय तुमे (प्रशासन) तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी होते.



