Mumbai Breaking News : मुंबईत घातपाताचा कट उधळला! दिल्लीत ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक

Mumbai ISI Breaking News : दिल्लीतून मुंबईला निघण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी केले जेरबंद
ANI :- देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला हादरवून टाकण्याचा आयसीसच्या दहशतवाद्यांचा मोठा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनवरून मुंबईकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या आफताब आणि सूफियान या दोन दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. या दोघांकडून तीन पिस्तुल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. Mumbai Breaking News
मुंबईत घातपाताचा होता डाव
दिल्ली पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, आफताब आणि सूफियान हे मुंबईचेच रहिवासी आहेत. मुंबईत मोठा घातपात घडवण्याचा त्यांचा डाव होता. त्यासाठी त्यांनी हरियाणामधील मेवात येथून स्फोटके आणि शस्त्रास्त्रे खरेदी केली होती. दिल्ली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या दोघांना मुंबईला निघण्यापूर्वीच ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबईतील त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवरही छापे टाकले आहेत. या ठिकाणांहून शस्त्रे आणि आयईडी (IED) बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सर्व संशयित दहशतवादी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानातील हँडलर्सच्या संपर्कात होते.
देशभरातील दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या कारवाईदरम्यान देशभरातून आयसीसच्या एका मोठ्या मॉड्यूलचा पर्दाफाश करत एकूण 5 दहशतवाद्यांना अटक केली आहे. यापैकी दोघे दिल्लीचे, तर एक मध्य प्रदेश, एक तेलंगणा (हैदराबाद) आणि एक झारखंड (रांची) येथील आहे.
या सर्व दहशतवाद्यांचा भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता. त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून अनेक तरुणांना आपल्या नेटवर्कमध्ये सामील केले होते. या कारवाईमुळे देशातील एका मोठ्या संभाव्य हल्ल्याचा धोका टळला आहे.



